माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीनला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:00 IST2019-01-21T18:58:06+5:302019-01-21T19:00:11+5:30
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीनला मारहाण
नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी आणि अभिनेत्री फरहीन प्रभाकर या 'ठक ठक गँगच्या बळी ठरल्या आहेत. या गँगने त्यांना मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
फरहीन कामानिमित्त शनिवारी साकेत मॉलमध्ये गेल्या होत्या. सिग्नलला मोटार थांबली असताना ठक ठक गँगच्या चोरट्यांनी त्यांना ठोसा मारला व त्यांचा जवळील मोबाईल आणि पर्स चोरुन तेथून पळ काढला. पर्समध्ये 16 हजार रुपये, महत्वाची कागदपत्रे होती. या दुखापतीमुळे फरहीन यांना अस्थमाचा झटका आल्याने त्या रस्तावर पडल्या. एका लष्करी अधिकाऱ्याने मदत करत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फरहीन प्रभारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांना 'ठक ठक गँग'ने मारहाण करत त्यांची पर्स लांबवल्याची घटना साकेत परिसरात घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 21, 2019