जळगावात माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 00:56 IST2018-11-05T00:55:49+5:302018-11-05T00:56:23+5:30
माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे यांचा मुलगा मानराज (वय २४ ) यान घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली.

जळगावात माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या
जळगाव - माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे यांचा मुलगा मानराज (वय २४ ) यान घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली. मानराज याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मानराज हा सायंकाळी पाच वाजेपासून घरातून गायब झालेला होता. मोबाईलवरही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबाने त्याचा शोध घेतला. रात्री पावणे नऊ वाजता लहान भाऊ देवराज हा सिंधी कॉलनी रस्त्यावरील नेहते अपार्टमेंटमध्ये असलेल्या जुन्या घरी शोध घ्यायला आला असता मानराज याने गळफास घेतल्याचे दिसले. देवराज याने घाबरलेल्या अवस्थेत घरी जावून वडील अरुण शिरसाळे व कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबाने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषीत केले.