शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 6:35 PM

शेतक-यांसाठीच्या हमी दरात तूर खरेदी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली होती.

यवतमाळ - नाफेडने महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटीिंग फायनान्सच्या माध्यमातून शेतक-यांसाठी हमी दरात तूर खरेदी केंद्र उघडले होते. या हमी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली. यात फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांनी दिली. या गुन्ह्यात स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवकासह दोघांना अटक केली. दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरिभाऊ काशीनाथ गुल्हाने (५८) रा.तेलीपुरा दारव्हा, अमीन बाहोद्दिन मलनस (५०) रा.वडगाव गाढवे ता.दारव्हा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरोधात १३ ऑक्टोबर २०१८ रोजी दारव्हा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार यांच्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला. या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य सूत्रधार माजी नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने हा पसार होता. त्याने सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून आरोपी पसार होता. त्याला अटक झाल्याने या गुन्ह्यातील आणखी वास्तव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखा पथकाने केली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी