दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 17:18 IST2020-09-16T17:15:00+5:302020-09-16T17:18:52+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.

दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून
नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांनी एका हत्याप्रकरणात महिलेसह तीन आरोपींनी अटक केली आहे. उत्तर दिल्लीतील वजीराबाद येथे 11 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर संबंधित व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तपास केल्यानंतर 24 वर्षीय महिलेसह तिच्या भावाला आणि मित्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर, जवळच निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. साहिल हा दारुच्या नशेत होता, त्याने जबरदस्ती करत शारीरिक संबंध बनविण्याचा प्रयत्न केला होता, असे आरोपी महिलेने म्हटले आहे.
साहिलच्या जबरदस्तीला विरोध केल्यानंतर साहिलने आरोपी महिलेला सिगारेटचा चटका दिला. त्यामुळे, रागाच्या भरात तिघांनी एकत्र येऊन साहिलचा गळा आवळून खून केला.