धक्कादायक! घरातील पाच जण फासावर; सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:10 AM2021-09-19T11:10:03+5:302021-09-19T11:10:35+5:30

कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ते चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. पोलिसांना संशय आहे की, या पाच जणांचा मृत्यू चार दिवस आधी झाला आहे. 

Five members of the family were killed; Rotten bodies found | धक्कादायक! घरातील पाच जण फासावर; सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह  

प्रतिकात्मक फोटो.

Next

बंगळुरू : बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे सडलेले मृतदेह फासावर लटकलेले सापडले आहेत. तर ९ महिन्यांचे बालक भुकेने व्याकूळ होऊन मृत झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अडीच वर्षांची मुलगी जिवंत राहिली आहे. 

कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ते चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. पोलिसांना संशय आहे की, या पाच जणांचा मृत्यू चार दिवस आधी झाला आहे. 

शंकर यांची पत्नी भारती (५१), मुलगी सिंचना (३४), सिंधुराणी (३१), मुलगा मधुसागर (२५) आणि ९ महिन्याचा नातू यांचे मृतदेह सापडले आहेत. सिंचनाला अडीच वर्षांची मुलगी होती. ती भूकेमुळे बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला वाचविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सिंचना ही तिच्या पतीसोबतच्या वादामुळे माहेरी आली होती. तर छोटी मुलगी प्रसूतिसाठी माहेरी आली होती. मुलगा इंजिनिअर होता, एका कंपनीत काम करत होता. पोलीस शंकरची चौकशी करत आहेत. 
 
Web Title: Five members of the family were killed; Rotten bodies found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app