दिल्लीतील घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:37 IST2020-02-12T15:35:26+5:302020-02-12T15:37:58+5:30

परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Five bodies found at a house in Delhi's Bhajanpura | दिल्लीतील घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ

दिल्लीतील घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ

नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील भजनपुरा परिसरात असलेल्या एका घरात पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भजनपुरा परिसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरूष हा रिक्षा चालक होता, असे सांगण्यात येत आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी पाहता हे आत्महत्येच प्रकरण दिसत आहे. मात्र, घरात चोरी सुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजणार आहे.

Web Title: Five bodies found at a house in Delhi's Bhajanpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.