गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:25 IST2025-07-19T18:22:46+5:302025-07-19T18:25:21+5:30

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar | गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

Chandan Mishra Murder Case:बिहारमधील पाटण्याच्या पारस रुग्णालयात झालेल्या चंदन मिश्राच्या हत्येप्रकरणी आरोपींनी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. पाटणा पोलिस आणि एसटीएफ टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली. चंदन मिश्राची हत्या करणाऱ्आ शेरू सिंह टोळीशी संबंधित शूटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, या घटनेप्रकरणी ८ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

पाटण्यातील गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी शनिवारी कोलकाताजवळील न्यू टाउनमधून पाच जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी न्यू टाउनच्या सॅटेलाइट टाउनशिपच्या कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये लपले होते. शनिवारी पहाटे बिहार पोलिस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्त छापे टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. अटक केलेल्या पाचपैकी चार जणांचा या हत्येत थेट सहभाग होता. तर पाचव्या आरोपीने इतरांना लपण्यास मदत केली. मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

दुसरीकडे, या प्रकरणात आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले यामध्ये एक उपनिरीक्षक, दोन कॉन्स्टेबल आणि इतर अनेक पोलिसांचा समावेश आहे. ही कारवाई पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी केली आहे. हत्येदरम्यान निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटलं जातंय. हल्लेखोरांनी पारस रुग्णालयात घुसून चंदन मिश्रावर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हेगार रुग्णालयाबाहेर पडले. त्यानंतर आरोपींचा एक फोटोही व्हायरल झाला ज्यामध्ये आरोपी दुचाकीवरून शस्त्रे हवेत फिरवताना दिसत होते.

दरम्यान, चंदन मिश्राच्या हत्येच्या वेळी खोलीत आणखी दोघे जण होते. त्यापैकी एकाला गोळी लागली, तर दुसऱ्याने बाथरूममध्ये लपून आपला जीव वाचवला. आरोपींनी खोलीत शिरताच चंदन मिश्रावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर कृष्णकांत पांडे जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये घुसले. गोळीबारात माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला गोळी लागली, ज्यामुळे मी तिथेच पडलो. यानंतर सर्व गुन्हेगार बाहेर आले, असं दुर्गेश पाठक नावाच्या व्यक्तीने सांगितले.

Web Title: Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.