शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आधी आई आणि नंतर मुलीवर बलात्कार, पीडितेला वेदना असह्य झाल्यानंतर ट्रेनसमोर मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:28 PM

Sexual Abuse : एफआयआरमध्ये ओसियांचे माजी आमदार आणि माजी संसदीय सचिव भैराराम यांच्यावरही कुटुंबाला जीवे मारण्याची आणि गावातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ओसियां : जोधपूर शहराजवळील मथानिया येथे एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या 6 दिवसांनंतर कुटुंबीयांनी जहागीरदार आणि मुलाविरुद्ध मुलीवर बलात्कार आणि त्यामुळे दुखी होऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये ओसियांचे माजी आमदार आणि माजी संसदीय सचिव भैराराम यांच्यावरही कुटुंबाला जीवे मारण्याची आणि गावातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाबाबत मृताच्या वडिलांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर २० एप्रिल रोजी बलात्कार झाला होता. तेव्हापासून ती शांत राहू लागली. तिने 11 मे रोजी आत्महत्या केली. त्याच दिवशी मथानिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी धीर दिल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठून पिता-पुत्रावर पोक्सो, बलात्कार आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. वडिलांनी मथानिया पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात सांगितले की, मुलीने ११ मे रोजी मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. जहागीरदाराचा मुलगा देवराम याने जबरदस्तीने बलात्कार आणि शारीरिक अत्याचार केल्याने त्याने हे कृत्य केले आहे.घटनेपूर्वी पत्नीने सांगितले की, मुलीचा फोन आला होता. त्यावेळी तिने सांगितले देवरामने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. याप्रकरणी उद्या सकाळी बोलू, असे स्पष्टीकरण पत्नीने दिले. मात्र, त्याआधीच तिने जीव दिला. गुन्हा दाखल करण्यासाठी मृत मुलीचे वडील पत्नीसह पोलीस ठाण्यात जाऊ लागले, तेव्हा जहागीरदार खेमाराम, त्यांचा मुलगा देवराम, माजी आमदार भैराराम आदींनी येऊन धमक्या देण्यास सुरुवात केली. गुन्हा दाखल झाल्यास कुटुंबाची हत्या करून समाज व गावातून हाकलून देऊ, असे त्यांनी सांगितले. या धमक्यांनी मी आणि माझे कुटुंब भयभीत झालो. माझ्या पत्नीचे आणि खेमारामचे संबंध होते. त्यामुळे खेमाराम याने गावात तुझी बदनामी करीन, अशी धमकी दिली. माझी मुलगी माझ्या मुलाच्या मोबाईलवर देवरामच्या मोबाईलवर बोलायची. खेमाराम आणि देवराम यांनी माझ्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार करून अवैध संबंध ठेवले होते, अशी माहिती मृत मुलीच्या वडिलांनी दिली. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थान