शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
4
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
5
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
6
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
7
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
8
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
9
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
10
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
11
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
12
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
13
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
14
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
15
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
16
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
17
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
18
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
19
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
20
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

आधी इन्स्टाग्रामवर भेट, नंतर दिली ऑफर; तरुणीवर धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:12 IST

एका २३ वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. 

Crime News in Marathi : इन्स्टाग्रामवर भेट झाली. मित्र बनले. नंतर त्याने चित्रपटात काम मिळवून देण्याची ऑफर देत भेटायला बोलावले आणि घात झाला. एका २३ वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

उत्तर प्रदेशातील लखनौ-बाराबांकी महामार्गावर ही घटना घडली आहे. पीडितेचा इन्स्टाग्रामवरील मित्र यातील प्रमुख आरोपी असून, त्याचे नाव विपीन सिंह असे आहे. 

चित्रपटात काम देण्याची ऑफर

इन्स्टाग्रामवर भेट झाल्यानंतर विपीन सिंहने तरुणीला चित्रपटात काम मिळवून देण्याची ऑफर दिली होती. कानपूरची रहिवासी असलेल्या या तरूणीला विपीनने लखनौला भेटायला बोलावले होते. 

एका चित्रपट दिग्दर्शकाशी भेट घालून द्यायची आहे, असे त्याने पीडितेला सांगितले होते. आरोपी विपीनने सांगितल्याप्रमाणे पीडिता लखनौला आली. 

२८ ऑगस्ट रोजी पीडिता विपीनला चिन्हाटमध्ये भेटली. त्यानंतर एका चित्रपट दिग्दर्शकाला भेटायचे आहे, असे सांगून आरोपी तिला कारमधून ऑफिसला घेऊन गेला. तिथे ती त्या व्यक्तीला भेटली. नंतर विपीनने तिला मतियारी क्रॉसिंगजवळ सोडतो म्हणून कारमध्ये बसवले. 

दोन मित्रांसोबत मिळून तरुणीवर केले अत्याचार

 मतियारी क्रॉसिंगकडे जाण्याऐवजी विपीन कार घेऊन बाराबांकी महामार्गाच्या दिशेने निघाला. त्यानंतर त्याचे दोन मित्र, विनाम सिंह आणि हिमांशु सिंह कारमध्ये बसले. त्यांनी गुंगी येणारा पदार्थ दिला, त्यामुळे पीडितेची शुद्ध हरपली. नंतर तिघांनी धावत्या कारमध्ये तरुणीवर अत्याचार केले. तरुणीला तिघांनी मारहाणही केली, असे तक्रारीत म्हटले आहे. 

जेव्हा पीडितेला जाग आली, तेव्हा ती चिन्हाटमधील एका रुममध्ये होती. समोर आरोपी विपीन बसलेला होता. त्याने पीडितेला याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया