शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

वेलट्रीट हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध पहिला गुन्हा दाखल, सदोष मनुष्यवधाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:10 AM

well treat Hospital : ९ एप्रिलच्या रात्री वेलट्रीटला लागलेल्या भीषण आगीत महंत यांचे सासरे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा) यांच्यासह एकूण चारजण या अग्निकांडात ठार झाले होते.

- नरेश डोंगरे

नागपूर - भीषण अग्निकांडामुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या वाडी येथील वेलट्रीट हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध वाडी पोलिसांनी सोमवारी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मृत व्यक्तीच्या जावयाने नोंदविलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रवीण रामदास महंत (वय ३७) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. ९ एप्रिलच्या रात्री वेलट्रीटला लागलेल्या भीषण आगीत महंत यांचे सासरे तुळशीराम सापकन पारधी (गोरेवाडा) यांच्यासह एकूण चारजण या अग्निकांडात ठार झाले होते.

महंत यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे वेलट्रीटमध्ये ५ एप्रिलला भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना महंत यांचे रुग्णालयात येणे-जाणे होते. रुग्णालयाने सुमारे पावणेदोन लाख रुपये घेऊनही, पाहिजे तशी रुग्णाची व्यवस्था केली जात नव्हती. कोरोना रुग्णांसाठी दाटीवाटीने बेड लावण्यात आले होते आणि तेथे पाहिजे तशा सुविधाही नव्हत्या. दरम्यान, ९ एप्रिलला रात्री हॉस्पिटलला आग लागली आणि आगीत तुळशीराम पारधी, शिवशक्ती भगवान सोनबरसे, प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले.

या घटनेची प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे चाैकशी करीत आहेत. वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या आगीचे कारण जाणून घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पाहणी केली. त्यांचा अहवाल अद्याप उघड झाला नाही.या पार्श्वभूमीवर, मृत पारधी यांचे जावई महंत यांनी सोमवारी सायंकाळी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आगीला आणि सासऱ्याच्या मृत्यूला वेलट्रीट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. त्यावरून वाडी पोलिसांनी रात्री डॉ. ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

दुसराही गुन्हा दाखल होण्याचे संकेत

या प्रकरणात ही स्वतंत्र तक्रार असून, आगीचे कारण निश्चित झाल्यास आणि त्यात हॉस्पिटल प्रशासनाचा दोष अधोरेखित झाल्यास आणखी दुसरा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. यासंबंधाने वाडीच्या ठाणेदारांशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळले.

दोषींना शिक्षा व्हायला हवीआर्थिक स्थिती चांगली नसताना हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घेते. मात्र, त्यांना पाहिजे तशा सुविधा उपलब्ध करून देत नाही. धोका टाळण्यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना करीत नाहीत. रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या मंडळींना शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया यानिमित्ताने तक्रारदार महंत यांनी ‘लोकमत’जवळ नोंदवली.

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी