गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या एपीआय सिद्धवा जायभाये यांच्यावर फायरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:56 IST2020-03-07T23:55:57+5:302020-03-07T23:56:08+5:30
अज्ञात इसमानं एक राउंड फायरिंग केली. त्या अज्ञात इसमाला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली

गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या एपीआय सिद्धवा जायभाये यांच्यावर फायरिंग
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार भागा मधल्या पालघर गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जयभाये यांच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अज्ञात इसमानं एक राउंड फायरिंग केली. त्या अज्ञात इसमाला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली असून घटनास्थळाच्या आसपास चे सीसीटीव्ही फुटेज पोलीस आता तपासत आहेत . सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जयभाये या गाडीनं पालघरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी हा अज्ञात इसम मोटार सायकलवर तोंडावर मास्क लावून आला आणि त्याने एक राउंड फायरिंग केली. त्यानंतर तो तिथून फरार झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
मुंबई अहमदाबाद मार्गावरील बर्गर किंग हॉटेलसमोर शनिवारी रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जायभाये या बर्गर घेण्यासाठी या हॉटेलमध्ये शिरल्या होत्या. त्यवेळी हल्लेखोराने त्यांच्या स्विफ्ट डिज़ायर कारवर एक राउंड फ़ायर करुन मुंबईच्या दिशेने पलायन केले.