मालेगावात रिक्षाचालकावर गोळीबार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 11:00 AM2021-11-02T11:00:25+5:302021-11-02T11:06:01+5:30

Crime News : याप्रकरणी रिक्षाचालक अशपाक शहा मुक्तार शहा ( २५)  रा. संजरी  चौक याने  आयशानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Firing on Rickshaw driver in Malegaon, case filed against three | मालेगावात रिक्षाचालकावर गोळीबार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

मालेगावात रिक्षाचालकावर गोळीबार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Next

मालेगाव (नाशिक) :- शहरातील कुसुंबा रोडवर रिक्षाचालकावर  गोळीबार केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध आयेशा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रिक्षाचालक अशपाक शहा मुक्तार शहा ( २५)  रा. संजरी  चौक याने  आयशानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

अशपाक हा नवीन बस स्टॅन्डकडून कुसुंबा रोडने  जात असताना अवलिया मशीद जवळ  सय्यद इरफान सय्यद इस्माईल उर्फ इरफान काल्याने आवाज दिला आशपाक  थांबला असता काल्याचा भाऊ सय्यद इस्राईल सय्यद इस्माईल व मुम्मू (पूर्ण नाव माहित नाही)  हे जवळ आले  किरकोळ बाचा बाची सुरू असतांना  इरफान काल्याने कमरेला लावलेली  गावठी पिस्तूल काढून जीवे ठार मारण्याचा हेतूने गोळीबार केला. 

अशपाक याने प्रतिकार करून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आयेशा नगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Firing on Rickshaw driver in Malegaon, case filed against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app