"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:42 IST2025-10-22T11:41:55+5:302025-10-22T11:42:16+5:30
महत्वाचे म्हणजे, या गोळीबारामागचे कारणही गोदारा गँगने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे...

"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
कॅनाडामध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगने फायरिंग केली होती. आता रोहित गोदारा गँगने जबरदस्त फायरिंग करवली आहे. यासंदर्भात गोदारा गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे. सिंगर तेजी कहलोंवर आपणच गोळीबारी करवल्याचा दावा त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, या गोळीबारामागचे कारणही गोदारा गँगने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे.
रोहित गोदाराशी संबंधित गँगस्टर महेंद्र सरणने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, जय श्री राम, राम राम सर्व बंधूंना. मी (महेंद्र सरण दिलाना) (राहुल_रिनाउ) (विक्की_फलवान) बंधूंनो, (कॅनडा) मध्ये (तेजी कहलों) वर हा जो गोळीबार झाला आहे, तो आम्हीच करवला आहे. याच्या पोटात गोळ्या लागल्या आहेत. यावर समजले तर ठीक, नाहीतर पुढच्या वेळी मारून टाकू! हा आमच्या शत्रूंना आर्थिक मदत करत होता. शस्त्रे पुरवत होता, कॅनडामध्ये आमच्या बंधूंची हेरगिरी करायचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखायचा. आमच्या बंधूंनकडे पाहणे तर दूरच, पण कोणी तसा विचारही केला, तर असे हाल करू की, इतिहासाच्या पानांतही गाजेल."
कुणा-कुणाला दिली धमकी? -
उसने लिखा, "मी तुम्हाला सांगतो, या गद्दाराच्या भानगडीत येऊन कोणी आमच्या बंधूंकडे वाकड्या डोळ्याने पाहिले अथवा याला कोणी आर्थिक मदत केली आणि आम्हाला कळले, तर त्याच्या कुटुंबीयांनाही सोडणार नाही! त्याचा पूर्ण नाश करू. हा इशारा सर्व बंधूंना, व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, हवाला व्यापाऱ्यांसह सर्वांना आहे! कोणीही मदत केली, तर तो आमचा शत्रू ठरेल! 'अभी तो शुरुवात हुई है. आगे-आगे देखो होता है क्या!'"
कपिल शर्माच्या कॅफेवरही झाला होता हल्ला -
यापूर्वी, कपिल शर्माच्या कॅफेवरही हल्ला झाला होता. 16 ऑक्टोबरला झालेल्या या हल्ल्यानंतर, एका उद्योगपतीच्या घरालाही निशाणा बनवण्यात आले होते. या दोन्ही घटनांची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ढिल्लोंने घेतली होती.