हरियाणवी गायिका राकेश श्योराणसह भावावर गोळीबार, हल्लेखोर झाला फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:36 IST2022-08-03T18:36:30+5:302022-08-03T18:36:48+5:30

Firing Case : तरुणांनी पिस्तुल दाखवत राकेश आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

Firing on Haryanvi singer Rakesh Sheoran and her brother, attacker absconded | हरियाणवी गायिका राकेश श्योराणसह भावावर गोळीबार, हल्लेखोर झाला फरार 

हरियाणवी गायिका राकेश श्योराणसह भावावर गोळीबार, हल्लेखोर झाला फरार 

 

चरखी दादरी : हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यात हरियाणवी गायिका राकेश श्योराण आणि तिच्या भावावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही थोडक्यात बचावले. राकेश या दादरीतील भिवानी रोडवरील पॉवर हाऊसजवळील रात्री जागरण कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ती एका पार्क केलेल्या कारमधून भावाकडे पोहोचली होती. यादरम्यान दोन तरुण पिस्तुल घेऊन आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तरुणांनी पिस्तुल दाखवत राकेश आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर तरुणांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात गायिका राकेश आणि त्याचा भाऊ थोडक्यात बचावले. गोळीबारानंतर रात्री जागरणमध्ये चेंगराचेंगरी झाली. गोळीबार करणाऱ्या तरुणांनी पळ काढला. महिला गायिकेवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. बध्रा येथील चांदवास गावातील रहिवासी असलेल्या गायिका राकेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Firing on Haryanvi singer Rakesh Sheoran and her brother, attacker absconded