सहार गावात कंत्राटदारावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:08 IST2019-01-16T17:07:50+5:302019-01-16T17:08:21+5:30

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

Firing in the contractor in Sahar village | सहार गावात कंत्राटदारावर गोळीबार

सहार गावात कंत्राटदारावर गोळीबार

मुंबई -  अंधेरी पूर्वेकडील सहार गावात आज एका कंत्राटदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. मुसार अब्दुल स्टार शेख असे या कंत्राटदाराचे नाव असून तो या गोळीबारातून थोडक्यात बचावला. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

बांधकामाची छोटी मोठी कंत्राटे घेणारा मुसार शेख हा सहार गाव परिसरात राहतो. आज दुपारी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मुसार याच्यावर अनोळखी इसमाने गोळीबार केला. गोळीबार करताच हल्लेखोर फरार झाले. मात्र, अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली आणि धावपळीमध्ये एक महिला खाली पडून जखमी झाली. मुसारच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. मात्र, वेळीच सावध झाल्याने तो या हल्ल्यातून बचावला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास सहार पोलीस करीत आहेत. मुसार एका गुन्ह्यातून नुकताच तुरूंगातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. या हल्ल्यामागे अंडरवर्ल्डचा हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत.

Web Title: Firing in the contractor in Sahar village