प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 09:57 PM2021-10-07T21:57:33+5:302021-10-07T21:58:03+5:30

Firing Case : हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता.

Firing on boss for not doing promotion; 10 lakh was given to the shooter | प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

प्रमोशन नाही केलं म्हणून बॉसवर केला गोळीबार; शुटरला दिले होते १० लाख

Next
ठळक मुद्दे २९ सप्टेंबर रोजी एमबीएमसीचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित (49) यांना दोन हल्लेखोरांनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाजवळ गोळ्या घातल्या.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (एमबीएमसी) दोन कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्या वरिष्ठांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी एमबीएमसीचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित (49) यांना दोन हल्लेखोरांनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाजवळ गोळ्या घातल्या.

हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा दीपक खांबित आपल्या कारमध्ये होता. हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर दोनदा गोळीबार केला, काच फुटली पण खांबित थोडक्यात बचावले. दोन्ही दुचाकीस्वार हल्लेखोरांनी रेनकोट घातले होते आणि ते हेल्मेट मागे सोडून पळून गेले

तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या हालचाली शोधण्यासाठी १०० सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करावे लागले. पोलिसांनी शुटरच्या हॅण्डलर पकडले आणि नंतर शुटर यूपीमधून पकडला गेला. मुंबईतील एका मॉलच्या बाहेर आरोपीवर गोळीबार केल्याची घटना आधीच घडली आहे. हल्लेखोरांची ओळख अमित सिन्हा आणि अजय सिंह अशी आहे.

तपासादरम्यान असे आढळून आले की,  शुटरला या गुन्ह्यासाठी 20 लाख रुपये देण्याचे ठरले होते आणि 10 लाख रुपये आधीच देण्यात आले होते. खांबितचे सहकारी असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी हा कट रचला होता. कारण त्यांचे 2004 पासून खांबित यांनी  पदोन्नती आणि चांगल्या पोस्टिंग केल्या नाहीत.

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे, कनिष्ठ अभियंता मोहिते आणि देशमुख यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार आहेत, मुंबई आणि मीरा भाईंदर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी या प्रकरणाची उकल करण्यात आली. 

Web Title: Firing on boss for not doing promotion; 10 lakh was given to the shooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app