शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

खळबळजनक! भाजपा ज्येष्ठ नेत्याच्या घरात गोळीबार, तिघांचे मृतदेह पडले होते रक्तबंबाळ अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 8:32 PM

मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक  घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे 50 वर्षीय आरोपी मूलचंद नागपुरात एका बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. बल्लारपूरमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्षांच्या भावाने त्याच्या दोन रिवॉल्व्हरने दोन मुलांना गोळ्या घातल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला.

चंद्रपूर -  बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डामध्ये झालेल्या हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. ज्येष्ठ भाजपा नेत्याच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली आहे. या  नेत्याच्या भावाने पोटच्या दोन्ही मुलांना रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक  घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बल्लारपूरमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्षांच्या भावाने त्याच्या दोन रिवॉल्व्हरने दोन मुलांना गोळ्या घातल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी वडिलांनीही स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. एकेक करून ५ गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.बल्लारपूरच्या भगतसिंग वॉर्डमध्ये  राहणाऱ्या भाजप नेत्याचा लहान भाऊ मूलचंद द्विवेदी यांनी भांडणातून अचानक त्यांच्या दोन मुलांवर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला, त्यात 22 वर्षांचा मुलगा आकाश ठार झाला आणि 18 वर्षीय मुलगा पवन गंभीर जखमी झाला. मृत मूलचंद यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होतं.  या घटनेची माहिती भाजपा नेते शिवचंद द्विवेदी यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जखमी पवनला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूरला पाठविण्यात आले.

50 वर्षीय आरोपी मूलचंद नागपुरात एका बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमुळे ते मोठ्या भावाकडे आला होते. त्यांचे दोन्ही मुलगे काकांकडे आधीपासूनच राहत होते. मूलचंदला एकूण तीन मुले. मोठा मुलगा आपल्या आईसोबत उत्तर प्रदेशात असतो. मुलचंद हा नागपूरला एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. त्याची दोन मुले मृतक आकाश व जखमी झालेला पवन हे बल्लारपूरला वास्तव्यास होती. मूलचंद हा मानसिक आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. लॉकडाऊन लागण्यापूर्वी तो बल्लारपूरला येऊन आपल्या मुलांकडे राहू लागला. लॉकडाऊनमुळे तो नागपूरला परत जाऊ शकला नाही. दरम्यान, मानसिक आजाराबाबत येथील एका खासगी रूग्णालयात त्याला उपचारार्थ दाखविण्यात आले होते, ही माहिती आता तपासात पुढे येत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्याला उपचारार्थ नागपूरला नेण्याचा मुलांचा विचार होता. घटनेच्या दिवशी त्याची मुले वडिल मूलचंदला हनुमानजींच्या दर्शनाकरिता नेणार होते. त्याकरिता मुलचंदने होकारही दिला होता. परंतु, सायंकाळी त्याने एकाएकी रिव्हॉल्वरमधून लहान मुलगा पवनवर गोळी झाडली. ती त्यांच्या हाताला लागल्याने तो जखमी झाला. बंदुकीचा आवाज ऐकून आकाश धावून आला. मूलचंदने दुसरी गोळी आकाशवर झाडली.  गोळी पोटात गेल्याने आकाश जागीच गतप्राण झाला. त्यानंतर मूलचंदने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वत:ला कोंडून घेतले.

काही क्षणातच त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे समाजमन सुन्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत घटनास्थळी धावून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हेही तेथे पोहोचले होते. पंचनामा करून रिव्हॉल्वर, रक्ताने माखलेले कपडे इत्यादी वस्तू जप्त केल्या. जखमी मुलगा पवनच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी मृतक वडिल मूलचंदविरूद्ध भा. दं. वि. कलम  ३०२ व ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगत करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

 

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

टॅग्स :FiringगोळीबारBJPभाजपाDeathमृत्यूMurderखूनSuicideआत्महत्याPoliceपोलिस