चंद्रपूर - बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डामध्ये झालेल्या हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. ज्येष्ठ भाजपा नेत्याच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली आहे. या नेत्याच्या भावाने पोटच्या दोन्ही मुलांना रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बल्लारपूरमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्षांच्या भावाने त्याच्या दोन रिवॉल्व्हरने दोन मुलांना गोळ्या घातल्या ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी वडिलांनीही स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. एकेक करून ५ गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.बल्लारपूरच्या भगतसिंग वॉर्डमध्ये राहणाऱ्या भाजप नेत्याचा लहान भाऊ मूलचंद द्विवेदी यांनी भांडणातून अचानक त्यांच्या दोन मुलांवर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला, त्यात 22 वर्षांचा मुलगा आकाश ठार झाला आणि 18 वर्षीय मुलगा पवन गंभीर जखमी झाला. मृत मूलचंद यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होतं. या घटनेची माहिती भाजपा नेते शिवचंद द्विवेदी यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जखमी पवनला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूरला पाठविण्यात आले.
काही क्षणातच त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे समाजमन सुन्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत घटनास्थळी धावून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हेही तेथे पोहोचले होते. पंचनामा करून रिव्हॉल्वर, रक्ताने माखलेले कपडे इत्यादी वस्तू जप्त केल्या. जखमी मुलगा पवनच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी मृतक वडिल मूलचंदविरूद्ध भा. दं. वि. कलम ३०२ व ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगत करीत आहेत.
आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...
Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली
खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून
लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या
Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये