शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पुण्यात शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळ्याजवळ हवेत गोळीबार..?  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 6:17 PM

पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली.मात्र,...

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील गुन्हेगारांनी शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळ्याजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी (दि. ७) दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली, मात्र, घटनास्थळी रिकामी काडतुसे किंवा गोळीबार झाल्याच्या खुणा आल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिले. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार झाला असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षातुन शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली. संबंधित व्यक्तीला सोबत घेऊन पोलिसांनी कामगार पुतळा परिसरातील रहिवासी, स्टॉलधारक, रिक्षाचालक यांच्याकडे चौकशी केली. मात्र, गोळीबार झाल्याचे कोणी सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याविषयी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, गोळीबाराची माहिती मिळाल्यापासून शिवाजीनगर पोलिसांसह व गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. हवेत गोळीबार झाला, एवढीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत आहोत.'

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसFiringगोळीबार