नांदेड शहरात पुन्हा गोळीबार; गावठी कट्ट्यासह दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:12 IST2019-09-05T14:10:17+5:302019-09-05T14:12:30+5:30

अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत़ 

Firing again in Nanded city; two were arrested with a gun | नांदेड शहरात पुन्हा गोळीबार; गावठी कट्ट्यासह दोघे अटकेत

नांदेड शहरात पुन्हा गोळीबार; गावठी कट्ट्यासह दोघे अटकेत

ठळक मुद्दे पोलिसांनी वेळीच धाव घेत दोघांना पकडलेमटक्याच्या वादातून दोन गटात वाद झाला़

नांदेड : नांदेड शहरात बुधवारी मध्यरात्री दोन गटात वादानंतर गोळीबार झाल्याचा प्रकार शहरातील वजिराबाद येथील दिलीपसिंह कॉलनीत घडला़ या प्रकरणात पोलिसांनी वेळीच धाव घेत दोघांना एक गावठी कट्टा आणि तीन काडतुसासह ताब्यात घेतले आहे़

काँग्रेस कार्यकर्ते आणि गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावरील गोळीबाराचा प्रकार नुकताच घडलेला असताना आणि या गुन्ह्याची पूर्णत: उकल झाली नसतानाच ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री दिलीपसिंह कॉलनीत मटक्याच्या वादातून दोन गटात वाद झाला़ याच वादातून गावठी कट्टयातून गोळीबारही करण्यात आला़ स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली़ त्यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्यासह वजिराबादचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थही धाव घेतली़ घटनास्थळावरून पोलिसांनी शेख अन्वरअली खाँ आणि प्रदीप सोनू राऊत्रे यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन काडतूस जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा तपास सुरू असून अन्य तिघांचा पोलिस शोध घेत आहेत़ 

Web Title: Firing again in Nanded city; two were arrested with a gun