शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग! पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना 'त्यानं' दिली थरकाप उडवणारी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 19:45 IST

Murder Case : तपासादरम्यान गावातील एक जोडपे खुनाच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.  सांवरिया दर्शनाला  गेल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण त्याचा मोबाईल डायल केला असता तो बंद असल्याचे आढळले.

रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याची कथा संपूर्ण फिल्मी आहे. प्रत्यक्षात तीन जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बदला घेण्यासाठी पीडितेच्या पतीने एका आरोपीला बॉम्बने (डायनामाइट) उडवले. पतीने इतर दोन आरोपींनाही मारण्याचा कट रचला होता पण त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला.प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या४ जानेवारी रोजी रतलाम जिल्ह्यातील एका गावात बॉम्ब पेरून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. शेतकऱ्याचा मृत्यू एवढा वेदनादायी होता की मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. प्राथमिक तपासात पोलिसांना कळले की, हे हत्येचे प्रकरण आहे आणि आधीच स्फोटकं पेरून पूर्णपणे नियोजन होते आणि मोटरच्या स्टार्टरला जोडले गेले होते. यानंतर पोलिसांनी एसआयटी स्थापन करून प्रकरणाचा तपास सुरू केला.तपासादरम्यान गावातील एक जोडपे खुनाच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.  सांवरिया दर्शनाला  गेल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण त्याचा मोबाईल डायल केला असता तो बंद असल्याचे आढळले. यानंतर या दाम्पत्यावरील पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी तपास करून जोडप्याला मध्यप्रदेशातील मंदसौर येथून ताब्यात घेतले.दोघांची चौकशी केली असता, आधी पतीने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली, मात्र नंतर पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी सुरेशने जानेवारीच्या रात्री मृत लालसिंगच्या शेतात जिलेटिन आणि डिटोनेटर पुरून मोटारच्या स्टार्टरला जोडल्याचे सांगितले. शेतकऱ्याने मोटार चालवण्यास सुरुवात करताच स्फोटाने त्याचे शरीराच्या चिंधड्या झाल्या.सूडाची कहाणी!पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता, आरोपी सुरेशने धक्कादायक खुलासा केला. सुरेशने सांगितले की, मृत लाल सिंग आणि त्याचे दोन साथीदार भंवरलाल आणि दिनेश यांनी वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना कोणाला सांगू नकोस, अशी धमकी आरोपीने दिली होती. तेव्हापासून सुरेश सुडाच्या आगीत जळत होता आणि या सूडपोटी त्याने तिघांच्याही हत्येचा कट रचला.लालसिंगप्रमाणे सुरेशने भंवरलालला बॉम्बने उडवण्याचा कट रचला होता, पण तो काही कारणाने वाचला. लालसिंगनंतर सुरेशलाही भंवरलाल आणि दिनेशला मारायचे होते. चौकशीत सुरेशने सांगितले की, स्फोटासाठी त्याने डिटोनेटर आणि जिलेटिन जवळच्या गावातील बद्री पाटीदाराकडून घेतले होते. बद्री बेकायदेशीरपणे जिलेटिन आणि डिटोनेटर्सची विक्री करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण