Sun Pharma Fire: सन फार्मा कंपनीला भीषण आग; एका कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 00:01 IST2021-12-08T22:58:38+5:302021-12-09T00:01:29+5:30

Ahmadnagar News : सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती कंपनीत पसरली आहे.

A fire broke out at Sun Pharma Company in MIDC of the ahmadnagar | Sun Pharma Fire: सन फार्मा कंपनीला भीषण आग; एका कामगाराचा मृत्यू

Sun Pharma Fire: सन फार्मा कंपनीला भीषण आग; एका कामगाराचा मृत्यू

अहमदनगर : एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्यात यश आले आहे. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. 

सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती कंपनीत पसरली आहे. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल  झाल्या आहेत. 

आग लागली त्या ठिकाणी काही कामगार काम करीत होते. त्यांची निश्चित संख्या समजू शकली  नाही. आग लागली त्याच्याजवळ लिक्विड टँक आहेत. आग आता आटोक्यात आली असून एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे महापालिका अग्नीशमन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले. 

Web Title: A fire broke out at Sun Pharma Company in MIDC of the ahmadnagar

टॅग्स :fireआग