Fire breaks out at Golden Gate Hotel; one died | गोल्डन गेट हॉटेलला भीषण आग; एकाच मृत्यू
गोल्डन गेट हॉटेलला भीषण आग; एकाच मृत्यू

ठळक मुद्देहॉटेलमध्ये अडकलेल्यांपैकी सहा जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.  रहिवासी परिसर असल्याने या हॉटेलमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला अडथळ्यांचा सामना करावा लागला.

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदुर येथील विजयनगर परिसरातील एका हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागली आहे. गोल्डन गेट असं हॉटेलचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवत असताना आग हॉटेलच्या पाचव्या मजल्यापर्यंत पसरत गेली. तसेच हॉटेलमध्ये अडकलेल्यांपैकी सहा जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. 

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत हॉटेलचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून इंदुरमधील सर्वात उच्चभ्रू वस्तीतील विजयनगर परिसरातील गोल्डन गेट हॉटेल आहे. रहिवासी परिसर असल्याने या हॉटेलमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला अडथळ्यांचा सामना करावा लागला. यात सहाहून अधिकजण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला आहे.


Web Title: Fire breaks out at Golden Gate Hotel; one died
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.