अभिनेते महेश ठाकूर यांची आर्थिक फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 08:48 IST2022-09-22T08:47:41+5:302022-09-22T08:48:07+5:30

मयंक गोयल नामक व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial fraud of actor Mahesh Thakur | अभिनेते महेश ठाकूर यांची आर्थिक फसवणूक

अभिनेते महेश ठाकूर यांची आर्थिक फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते महेश ठाकूर यांची तब्बल पाच कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात मयंक गोयल नामक व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ठाकूर यांचा मालमत्तेचा वाद सुरू असून यासंदर्भात न्यायालयीन कामकाज, पुरावे आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली. महेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्यात ५ कोटी ४३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप महेश यांनी मयंकवर केला आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाकूर यांनी हम साथ साथ हैं, हम हो गये आप के, तुम वीर हो, सत्या २, जय हो, करले प्यार करले, हमको दीवाना कर गए, आकाशवाणी या चित्रपटांमध्ये महेश यांनी काम केले आहे.  

Web Title: Financial fraud of actor Mahesh Thakur