अभिनेत्रीला फोनवरून त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:52 IST2019-06-14T13:44:36+5:302019-06-14T13:52:57+5:30

ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Filmmaker filed a complaint against the molestation accused by phone | अभिनेत्रीला फोनवरून त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अभिनेत्रीला फोनवरून त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देया इसमाने स्वतःची ओळख राहुल चौधरी म्हणून करून दिली होती. सायबर पोलिसांची देखील मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  तीन वेगवेगळ्या ज्या क्रमांकांवरून कॉल आले होते.

मुंबई - गेले आठ महिने एका ३३ वर्षीय अभिनेत्रीला मोबाईलवर कॉल करून त्रास देणाऱ्या आणि व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अज्ञात इसम पीडित अभिनेत्रीला ऑक्टोबर २०१८ पासून कॉल करत होता असून तो तिला माझ्याशी अनैतिक संबंध ठेव, त्याबदल्यात मी तुला चित्रपटात काम देईन. त्यातून तू ५ कोटी कमावशील असे अज्ञात आरोपीने अभिनेत्रीला आमिष दाखविले. मात्र, अभिनेत्रीने दुर्लक्ष केले. नंतर अज्ञात इसमाने तिला व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील व्हिडीओ आणि मेसेज करण्यास सुरुवात केली. या इसमाने स्वतःची ओळख राहुल चौधरी म्हणून करून दिली होती. मग मात्र, त्या अभिनेत्रीने पोलीस ठाणे गाठले. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून तीन वेगवेगळ्या ज्या क्रमांकांवरून कॉल आले होते. या तिन्ही क्रमांकांची माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. सायबर पोलिसांची देखील मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  


 

Web Title: Filmmaker filed a complaint against the molestation accused by phone