पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:23 IST2018-12-19T16:23:24+5:302018-12-19T16:23:52+5:30
आरोपीने १३ वर्षीय मुलीचा पाठलाग केला. तू माझ्या मित्राला आवडतेस, असे म्हणत त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : तू माझ्या मित्राला खुप आवडतेस, असे सांगण्यास आलेल्या तरुणाला अल्पवयीन मुलीने तातडीने निघून जाण्यास सांगितले. मात्र, तरूणाने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. रस्त्यात अडवुन तिचा हात पकडून आमच्याबरोबर बोलायची तुझी लायकी नाही. तुझ्यापेक्षा चांगल्या पोरी आम्हाला भेटतील. असे कृत्य करणाऱ्या गांधीनगर येथील तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल सुनील वेताळ (वय १९, रा. गांधीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खराळवाडी येथे घराकडे जात असताना, आरोपीने १३ वर्षीय मुलीचा पाठलाग केला. तू माझ्या मित्राला आवडतेस, असे म्हणत त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलीने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडून आरोपीने तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच तुझ्याकडे, तुझ्या कुटुंबियाकडे बघून घेतो. असे धमकावले. मुलीने आरोपीविरोधात पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.