रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 20:52 IST2020-10-16T20:51:20+5:302020-10-16T20:52:28+5:30
Molestation : महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
मीरारोड - रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा काशिमीरा पोलिसांनी दाखल केला आहे. तर महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
पीडित महिला हि काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन बसली होती . तिची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली असून शेलेकर यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात सदर महिलेचा विनयभंग केला. तर कृष्णा कांबळे ह्याने काशिमीरा नाका येथे जुलै २०१८ मध्ये त्याच्या गाडीत महिलेस थंडपेयात गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. घोडबंदर शिफ्टिंग येथे सदर महिलेस अजय सिंह, विशाल व संजय यांनी दमदाटी व शिवीगाळ केली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर हे तपास करत आहेत.