शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल; विजन रुग्णालयाने दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:28 IST

Filed a case against Jitendra Bhave : यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देशहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते.

नाशिक : शहरातील कॉलेजरोडवरील विजन रुग्णालयात एका रुग्णावर करण्यात आलेल्या उपचारखर्चाची मुळ कागदपत्रांची मागणी करण्यासाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’चळवळीचे जितेंद्र भावे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह शनिवारी (दि.२२) पोहचले. त्यांनी मयत कोविड रुग्णाच्या उपचारखर्चाांची मुळ बिले व अन्य कागदपत्रांची मागणी केली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रार सरकारवाडा पोलिसांकडे डॉक्टरांनी केली आहे. यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते. हे आंदोलन सोशलमिडियावरुन थेट प्रसारित करण्यात आल्याने ते चांगलेच चर्चेत आले. दरम्यान, गेल्या शनिवारी भावे हे विजन रुग्णालयात अवाजवी बिल आकारल्याची तक्रार घेऊन गेले होते.कोरोनाबाधित दत्तात्रय पांडुरंग आटवणे यांच्यावर औषधोपचार सुरु असताना शुक्रवारी (दि.२१) ते विजन रुग्णालयत मयत झाले. यानंतर मयताचे नातेवाईक स्वप्नील आटवणे, सायली आटवणे, यांच्यासह जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे आदिंनी कोविड कक्षात येऊन शनिवारी गर्दी केली.तसेच रुग्णालयाने जास्त बिलांची रक्कम आकारल्याचे सांगत रुग्णावर काय व कोणत्या प्रकारचे उपचार केले, त्याची मुळ कागदपत्रांची मागणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांना धमकावून दैनंदिन वैद्यकिय कामकाजात अडथळा निर्माण करत मेडिकल, रक्त तपासण्यांसाठी आलेल्या खर्चाची रक्कम न देता रुग्णालयातून निघून गेले असे डॉक्टर विक्रांत विनोद विजन (३७, पाटील लेन, कॉलेजरोड) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित जितेंद्र भावे, स्वप्नील आटवणे, रोहन देशपांडे, सोमा कुऱ्हाडे यांच्याविरुध्द अशा पाच लोकांवर वैद्यकिय सेवा, व्यक्ती, संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी अधिनियम २०१०नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलagitationआंदोलन