शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Mayuresh Raut: परमबीर सिंगांवर आरोप करणारे बिल्डर मयुरेश राऊत यांचाच पाय खोलात; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 4:18 PM

Filed a case against Builder Mayuresh Raut : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांवर आरोप करणारे विरारचे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच तुलिंज  पोलीस ठाण्यात गुन्हा  

ठळक मुद्देविरारमधील बिल्डर मयुरेश राऊत यांच्याच विरोधातच आता तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि एमआरटीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.  मयुरेश राऊत हे ठाण्यातील मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर प्रकाश झोतात आले होते. 

वसई  - मुंबईतील वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि ठाण्यातील मयत मनसुख हिरेन प्रकरणानंतर चर्चेत येऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करणाऱ्या विरारमधील बिल्डर मयुरेश राऊत यांच्याच विरोधातच आता तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि एमआरटीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. Filed a case against Builder Mayuresh Raut, who has allegations on Parambir Singh 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार शहर महापालिका प्रभाग समिती "ब" अनधिकृत बांधकामाचे लिपिक अक्षय मोखर (वय २९) यांनी गुरुवारी तुळींज पोलीस ठाण्यात नालासोपारा पूर्व विजयनगर येथे मौजे तुळींज सर्वे क्रं. 221 हिस्सा क्रं.1 येथे बनावट बांधकाम परवाने तयार करून 4 मजली इमारत बांधून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक केली म्हणून बिल्डर मयुरेश राऊत व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतर भागीदारांवर सुद्धा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. मयुरेश राऊत हे ठाण्यातील मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर प्रकाश झोतात आले होते. 

धक्कादायक प्रकार म्हणजे मुंबईतील सचिन वाझे प्रकरण सुरू असतानाच त्यांनी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करत आपल्या जीवाला धोका असल्याचे माध्यमाद्वारे सांगितले होते.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगVirarविरारVasai Virarवसई विरारthaneठाणेPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार