चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:45 IST2023-03-03T09:44:24+5:302023-03-03T09:45:44+5:30

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी कंचन गुर्जरने तक्रार देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या केसचा तपास करत होते.

Fifth wife killed her husband by cutting his private part due to fed up with the harassment in Singrauli | चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह

चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह

Crime News : मध्य प्रदेशमधील उर्ती जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या हत्येचा पोलिसांना खुलासा केला आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिला तुरूंगात टाकण्यात आलं. गेल्या 21 फेब्रुवारीला बीरेंद्र गुर्जरचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर जखमांच्या खुणा होत्या.

पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी कंचन गुर्जरने तक्रार देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या केसचा तपास करत होते. पोलिसांना मृतकाच्या अनेक नातेवाईकांसह इतरही लोकांची चौकशी केली.

यादरम्यान त्याच्या पत्नीवरही पोलिसांना संशय आला. पोलिसांनी जेव्हा तिची चौकशी केली तेव्हा घटनेचा खुलासा झाला. मृतकाची पत्नी कंचनने सांगितलं की, तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत तो तिला मारहाण करत होता. 

त्याच्या त्रासाला कंटाळून तिने पतीची हत्या करण्याचा प्लान केला आणि 21 फेब्रुवारीला तिने पतीला 20 झोपेच्या गोळ्या दिल्या. पती झोपल्यानंतर तिने त्याची हत्या केली. आधी तिने पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्यानंतर त्याच्या गुप्तांगावरही वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर कंचनने पतीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकला. हेच नाही तर आरोपी महिलेने पुरावे मिटवण्यासाठी मृतकाचे कपडे आणि चप्पलही जाळली.

पोलिसांनुसार, कंचन गुर्जरची पाचवी पत्नी होती. याआधीच्या चार पत्नी त्याला वैगातून आधीच त्याला सोडून गेल्या होत्या. कंचनने त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याची हत्या केली.

Web Title: Fifth wife killed her husband by cutting his private part due to fed up with the harassment in Singrauli