पाचव्या पत्नीने कथित संताविरोधात दाखल केला बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 23:29 IST2020-02-10T23:27:45+5:302020-02-10T23:29:15+5:30

तांत्रिक बाबाच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Fifth wife filed rape case against alleged saint | पाचव्या पत्नीने कथित संताविरोधात दाखल केला बलात्काराचा गुन्हा

पाचव्या पत्नीने कथित संताविरोधात दाखल केला बलात्काराचा गुन्हा

 

शाहजहांपुर - उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही शहरातील तथाकथित संताविरूद्ध त्याच्या पाचव्या पत्नीने पोलीस ठाण्यात बलात्कार आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही  वाच्यता न करता दीड आठवड्यापर्यंत हे प्रकरण लपवून ठेवले.

या प्रकरणाचे तपास अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, निगोही पोलीस ठाण्यात स्वयंभू संत आणि तांत्रिक अनुज चेतन सरस्वती आणि त्याचा भाऊ रवी यांच्याविरूद्ध कथित संताच्या 28 वर्षीय पाचवी पत्नी पिंकी चौहान हिने तक्रार दाखल केली आहे.


पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे सिंह म्हणाले की, पीडित महिला आरोपी संताची पाचवी पत्नी आहे. यापूर्वी त्याने चार महिलांशी लग्न केले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुढे ते म्हणाले, तांत्रिकचा धाकटा भाऊ रवी याने तिच्यावर बलात्कार केला आणि या षडयंत्रात तिची सासू आणि पती यांचा हात असल्याचा आरोप पीडित पत्नीने केला.

तपास अधिकााारी सिंह म्हणाले की, संत असल्याने कोणतीही भांडण होत नाही, म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीस तटस्थ राहिले. शुक्रवारी कथित संंताच्या हरिद्वार येथील आश्रमात छापा टाकण्यात आला, पण त्यांच्या अनुयायांनी पोलिसांना पुढे जाऊ दिले नाही आणि कथित संत तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.


या प्रकरणाचा तपास केला जात असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याच्या संभाव्य ठिकठिकाणी छापे टाकून तांत्रिक बाबाच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Web Title: Fifth wife filed rape case against alleged saint