महिला विधवा तर तरूण अविवाहित; नदीत उडी घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:50 PM2021-03-11T20:50:12+5:302021-03-11T20:50:37+5:30

Suicide : या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Female widows while young unmarried; Lovers committed suicide by jumping into the river | महिला विधवा तर तरूण अविवाहित; नदीत उडी घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

महिला विधवा तर तरूण अविवाहित; नदीत उडी घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकुंदा रमेश कुंभलकर (३३) आणि नाशिक महादेव बावनकुळे (२८) रा. शुक्रवारी भंडारा अशी मृतांची नावे आहे.

भंडारा : प्रेम प्रकरणातून विधवा महिलेसह एका अविवाहित तरूणाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा येथील निर्वाण घाटावर गुरूवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


कुंदा रमेश कुंभलकर (३३) आणि नाशिक महादेव बावनकुळे (२८) रा. शुक्रवारी भंडारा अशी मृतांची नावे आहे.  हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या दिवाणघाटावर महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटविली असता ती कुंदा कुंभलकर असल्याचे पुढे आले. त्याच परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता दुपारी ३.३० वाजता नाशिकचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. कुंदा ही एका किराणा दुकानात कामाला होती. तिला १४ वर्षाचा मुलगा आणि ११ वर्षाची मुलगी आहे.  तर नाशिकचे भाजीपाल्याचे दुकान असून तो अविवाहीत आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी भेट दिली. या घटनेची माहिती शहरात पसरताच अनेकांनी दिवाणघाटाकडे धाव घेतली होती.

 

Web Title: Female widows while young unmarried; Lovers committed suicide by jumping into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.