फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जामीन; म्हणाली, "त्याच्या आईच्या सांगण्यावरुन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:21 IST2025-07-23T20:19:03+5:302025-07-23T20:21:35+5:30

विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिला शिक्षिकेला कोर्टाने जामीन मंजूर केला.

Female teacher who sexually abused a student by taking him to a 5 star hotel in Mumbai got bail | फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जामीन; म्हणाली, "त्याच्या आईच्या सांगण्यावरुन..."

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेला जामीन; म्हणाली, "त्याच्या आईच्या सांगण्यावरुन..."

Mumbai Crime: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरण अटक केली होती. या शिक्षिकेविरोधात पॉक्सो कायदा, जुवेलवनाइल जस्टिस अॅक्ट आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभर ही शिक्षिका विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करत होती. सुरूवातीला शिक्षिका विद्यार्थ्याला कारमध्ये घेऊन जायची आणि तिथेच त्याच्यावर बलात्कार करायची. नंतर ती त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली होती. त्यानंतर आता या शिक्षिकेला कोर्टाने मोठा दिलासा दिला.

अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात अटक झालेल्या एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मंगळवारी विशेष न्यायाधीश सबिना अल्ताफ मलिक यांनी आरोपी शिक्षिकेला ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, ज्यामध्ये एक किंवा अधिक जबाबदार जामीनदारांच्या हमीची अट होती. जामीनासाठी अर्ज करताना शिक्षिकेने आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले, मुलाची आई आमच्या नात्याविरोधात होती. त्यामुळे तिने माझ्याविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा शिक्षिकेने केला होता.

त्यानंतर सोमवारी ४० वर्षीय महिला शिक्षिकेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने शिक्षिकेला तिच्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या निवासस्थानाचा पुरावा, ओळखपत्र आणि मुंबईत राहणाऱ्या दोन जाणकार व्यक्तींचा पत्ता आणि संपर्क साधण्यासाठीच सादर करण्यास सांगितले. याशिवाय, न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला, ती पीडितेशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधणार नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधणार नाही. पीडित मुलाल किंवा कोणत्याही साक्षीदाराला धमकावणार नाही, कोणतेही आश्वासन किंवा प्रलोभन देणार नाही. तसेच, तिला प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल आणि परवानगीशिवाय मुंबई सीमेवरून बाहेर पडू शकणार नाही,  सक्त सूचना दिल्या आहेत.

जामीन अर्जात शिक्षिकेने हा खटला खोटा आणि द्वेषपूर्ण असून विद्यार्थ्याच्या आईच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचे म्हटलं. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी तिच्यावर प्रेम करत होता. वकिलाने न्यायालयात विद्यार्थ्याने पाठवलेल्या हस्तलिखित नोट्स, मेसेज आणि संभाषणांचा उल्लेख केला ज्यामध्ये त्याने शिक्षिकेला 'पत्नी' असे म्हटलं होते.

Web Title: Female teacher who sexually abused a student by taking him to a 5 star hotel in Mumbai got bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.