शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'व्हिडीओ गेम'च्या नावाखाली शिक्षिका मुलासोबत करायची अश्लील चाळे, एक दिवस अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 22:12 IST

हा अभ्यासाचा भाग असल्याचं सांगत शिक्षिका विद्यार्थ्याबरोबर 'नको ते' करत होती

Teacher molested student: भारतासह अनेक देशांमध्ये शिक्षक हे देवासमान मानले जातात. मातृदेवो भव, पितृदेवा भव यानंतर आचार्य देवोभव - असं म्हटलं जातं. शिक्षक हा देशाचं भविष्य घडवत असतो. म्हणूनच जगभरात अनेक ठिकाणी आई-वडिलांनंतर शिक्षकांना स्थान दिले जाते. पण सध्या एका शिक्षिकेने या पेशाला आणि नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेबाबत एक अशी  बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही महिला शिक्षिका तिच्या अल्पवयीन मुलांसोबत चक्क अश्लील चाळे करताना पकडली गेली आहे.

नक्की काय आहे प्रकार?

ही घटना ऑस्ट्रेलियातील एका शहरातील आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतीच या महिलेला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ही महिला दोषी आढळली आहे. या महिलेला तिच्या विद्यार्थिनींसोबत चुकीचे कृत्य करताना पकडण्यात आले. एवढेच नाही तर तिने विद्यार्थ्यांना व्हिडिओ गेमचे आमिष दाखवून हे सर्व कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे. हा अभ्यासाचाच एक भाग असल्याचे तिने विद्यार्थ्यांना सांगितले आणि त्याला 'कॉल ऑफ ड्यूटी' असे नाव दिले.

मिळालेल्या अहवालानुसार, या प्रकरणाची सुनावणी क्रमिक पद्धतीने झाली. हे प्रकरण काहीसे जुने असले तरी नुकतेच या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे आणि महिला शिक्षिकेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

असा उघडकीस आला प्रकार

रिपोर्टनुसार, मेलबर्नमधील व्हिक्टोरियाच्या काउंटी कोर्टात हा निर्णय सुनावण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण जुलै 2021 मध्ये सुरू झाले. ती शिक्षिका व्हिडीओ खेळण्यासाठी त्या विद्यार्थ्याला घरात बोलवत होती आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे करत होती. पण एक दिवस अचानक ही गोष्ट मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचली आणि तिचं बिंग फुटलं. घटना उघडकीस आल्यावर तिने सांगितले की तिचे त्या मुलावर प्रेम आहे. त्या मुलाच्या पालकांनी महिला शिक्षिकेला अनेकदा खडसावले, पण तिने विचित्रपणा सुरूच ठेवला. अखेरीस मुलाच्या पालकांनी तिच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि आता तिला शिक्षा झाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीMolestationविनयभंगAustraliaआॅस्ट्रेलियाjailतुरुंग