महिला डॉक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:51 IST2022-03-04T13:50:50+5:302022-03-04T13:51:11+5:30
Suicide Case : डॉ.नेहा हेमराज पारधी (३०) असे मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.

महिला डॉक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवारी (दि.४) सकाळी ९ वाजता उघडकीस आली. डॉ.नेहा हेमराज पारधी (३०) असे मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.
डॉ. नेहा पारधी या तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहात होत्या. त्या दंत रोग तज्ज्ञ असून त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या खोली बाहेर न पडल्यामुळे घरमालकाने त्यांच्या खोलीकडे पाहिले असता त्यांच्या खोलीचे दार आतून बंद होते. याची सूचना त्यांनी लगेच डॉक्टरच्या वडिलांना दिली. डॉक्टरच्या वडिलांनी खोलीवर येऊन पाहणी केली असता डॉ. नेहा पारधी यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला होता. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील कारण हे कळू शकले नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.