शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कोरोनाच्या भीतीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी दिले सोडून ; फसवणूक प्रकरणी घेतले होते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 9:56 PM

उपमहापौर चौकशी करताना खोकत व शिंकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

ठळक मुद्देएकच फ्लॅट अनेक जणांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी उपमहापौराविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : एकच फ्लॅट अनेक जणांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील उपमहापौराला पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी करताना शनिवारी (दि. ३०) तो खोकत व शिंकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला चौकशीकामी पोलीस ठाण्यात पुन्हा हजर होण्याची नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले. राजेश दिलीप काळे (वय ४०, रा. सोलापूर) असे उपमहापौराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याने पिंपळे निलख येथील एक फ्लॅट अनेक जणांना विक्री केला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गेल्यावर्षी आरोपी काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच काळे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काळे याला शुक्रवारी सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यासाठी सांगवी पोलिसांचे एक पथक सोलापूरला गेले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला सांगवी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी शनिवारी त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी काळे याला शिंका येऊन तो खोकत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला समज दिली, तसेच चौकशीकामी पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवीnigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी