गोरखपूर - गोरखपूर येथे शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दिवाणी न्यायालयाच्या गेटवर गोळ्या घालून पीडित मुलीच्या वडिलांनी ठार केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दिलशाद हुसेन असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर गोळी झाडणारा हा पीडित मुलीचे वडील असल्याचे सांगण्यात येत आहे. दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.न्यायालयाच्या गेटवर ही घटना घडली. आरोपी दिलशाद हुसैन हा कोर्टात एका वकिलाला भेटायला आला होता. यादरम्यान कोर्टाच्या मुख्य गेटवरच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. यावेळी काही पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, त्यांनी गोळीबार झाल्याचं ऐकून पळ काढल्याचा आरोप आहे. या खळबळजनक हत्येनंतर ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तो पीडित मुलीचा बाप असल्याचे सांगण्यात येत आहे.बलात्काराचा आरोपी दिलशाद जामिनावर बाहेर होताअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३० वर्षीय दिलशाद हुसेन जामिनावर बाहेर होता. या प्रकरणात त्याची पहिली हजेरी कोर्टात लावायची होती. दिलशाद हुसेन याने दुपारी त्याच्या वकिलाला बोलावले. कोविड प्रोटोकॉलमुळे वकील त्याला भेटण्यासाठी बाहेर येणार होते, त्यादरम्यान मुलीच्या वडिलांनी त्याला पाहताच गोळीबार केला.