पिता झाला हैवान! लेकीच्या अंगात भूत शिरल्याचा संशयातून जन्मदात्यानेच घेतला जीव, दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 18:17 IST2022-10-13T18:06:59+5:302022-10-13T18:17:55+5:30

अंधश्रद्धेमुळे एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा जीव तिच्या जन्मदात्या बापानेच घेतला.

father kills 14 year old daughter due to black magic police nabbed the accused in gujrat | पिता झाला हैवान! लेकीच्या अंगात भूत शिरल्याचा संशयातून जन्मदात्यानेच घेतला जीव, दिली भयंकर शिक्षा

पिता झाला हैवान! लेकीच्या अंगात भूत शिरल्याचा संशयातून जन्मदात्यानेच घेतला जीव, दिली भयंकर शिक्षा

केरळमध्ये श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी एका दाम्पत्याने दोन महिलांचा बळी दिल्याची घटना ताजी असताना आता देशात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमध्ये भयंकर प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेमुळे एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा जीव तिच्या जन्मदात्या बापानेच घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील धावा गावात ही घटना घडली. तंत्रविद्येची साधना करणाऱ्या पित्याने आपल्या मुलीचा बळी दिला. 

14 वर्षांच्या मुलीच्या शरीरात भूत असल्याचा संशय वडिलांना होता. त्याला पळवण्यासाठी 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत त्याने अनुष्ठान केलं. याच दरम्यान त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलीला काठीने आणि तारांनी मारहाण केली. तिला उपाशी ठेवलं. सातव्या दिवशी मुलीनं जीव सोडला. यानंतर त्यानं मुलीचा मृतदेह चादर आणि प्लास्टिकमध्ये लपेटून स्मशानात नेला आणि तो जाळून टाकला. भावेश अकबरीने त्याची मुलगी धैर्याची काळ्या जादूने आणि तंत्रमंत्राने हत्या केल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. 

धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचं पथक धावा गावात पोहोचलं. भावेशने आधी काळी जादू करून धैर्याला जमिनीत गाडलं आणि मग तिला बाहेर काढून जाळल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं. धैर्याच्या अंगात भूत असल्याचा संशय भावेशला होता. सलग सात दिवस तिचा छळ केल्यानंतर त्याने मुलीची हत्या केली, अशी माहिती गिर सोमनाथ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंह जाडेजा यांनी दिली.

धैर्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात भावेशचा भाऊ दिलीपने त्याला मदत केली. दोघे धैर्याला घेऊन शेतात गेले. तिथे धैर्याचे जुने कपडे जाळले. दोन तास तिला आगीजवळ उभं केलं. त्यानंतर ऊसाच्या शेतात काठी आणि तारांनी तिला मारलं. तिच्या केसात एक दांडा बांधला आणि उपाशी ठेवलं. या त्रासामुळे मुलीनं जीव सोडला, असं जाडेजा यांनी सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: father kills 14 year old daughter due to black magic police nabbed the accused in gujrat