चिकन करी खायला न मिळाल्याने बाप संतापला; दांडक्याने बेदम मारुन केली लेकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 15:18 IST2023-04-06T15:18:19+5:302023-04-06T15:18:53+5:30

चिकन करीमुळे बाप पोराची हत्या करेल, असा विचारही कोणी केला नसेल.

Father killed his own son for not giving ChickenCurry to him, incident in Karnataka | चिकन करी खायला न मिळाल्याने बाप संतापला; दांडक्याने बेदम मारुन केली लेकाची हत्या

चिकन करी खायला न मिळाल्याने बाप संतापला; दांडक्याने बेदम मारुन केली लेकाची हत्या


मंगळुरू: कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बापाला आपल्या पोटच्या पोराची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. घटना वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल. घरी बनवलेल्या चिकन करीवरुन बाप-लेकात वाद झाला आणि याच वादातून बापाने पोराची हत्या केली.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, घरी चिकन करी बनवली होती, पण वडिलांना ती खायला मिळाली नाही. यामुले आरोपी बाप संतापला. त्याला इतका राग आला की, त्यांने आपल्या 32 वर्षीय मुलाला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार(4 एप्रिल)ची आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथे ही घटना घडली.

शिवराम असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, शीना असे आरोपी बापाचे नाव आहे. घरात चिकन करी बनवली होती, पण ती सर्व शिवरामने खाऊन टाकली. आरोपी घरात आला तेव्हा त्याला चिकन करी खायला मिळाली नाही. या साध्या गोष्टीवरुन त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपीने मुलाला काठीने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना अटक केली. 

 

Web Title: Father killed his own son for not giving ChickenCurry to him, incident in Karnataka