शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बाप की हैवान! पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 15:28 IST

वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता.

ठळक मुद्दे या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अजय गोते यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. १४ जुलै २०१६ रोजी भाऊ व मावशी सोबत घेऊन पीडित मुलीने पांढरकवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

पांढरकवडा (यवतमाळ) : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला येथील न्यायालयाने शनिवारी १० वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ही बाब कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. 

एवढेच नव्हे तर घराबाहेर जाताना तो पीडित मुलीला घरात डांबून ठेवत होता. ही बाब पीडितेचा भाऊ व मावशीला कळली. त्यानंतर १४ जुलै २०१६ रोजी भाऊ व मावशी सोबत घेऊन पीडित मुलीने पांढरकवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी नराधम पित्याविरूद्ध भादंवि ३७६, ३७६ एफजेके, ३४२, ५०६ तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ४, ६, १२ तथा माहिती तंत्रज्ञान कायदा ६६-ई, ६७-ब अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तपासाअंती आरोपीविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने पांढरकवडाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अजय गोते यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. तसेच घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांचीही साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद न्ययमूर्ती पी.बी.नाईकवाड यांनी ग्राह्य धरून आरोपीला पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १० वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक हजार रूपये दंड व पीडितेस घरात डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून जमादार संतोष राऊत यांनी काम पाहिले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

 

स्वतःचेच चित्र रेखाटून मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयYavatmalयवतमाळPrisonतुरुंगjailतुरुंग