सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:14 IST2025-07-19T17:05:19+5:302025-07-19T17:14:15+5:30

UP Crime News: सुनेवरूनच वाद सुरू झाला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं...

father in law had crush on daughter in law heated arguments turned into violence with fatehr killed son in Uttar Pradesh Crime | सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील जगदीशपुरा पोलीस स्टेशन परिसरातील लधमदा गावात एक नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका सासऱ्याची आपल्या सुनेवर वाईट नजर होती. त्यावरूनच त्याचे सतत आपल्या मुलाशी भांडण होत असे. २६ वर्षीय पुष्पेंद्र चौहान हा त्याच्या वडिलांच्या वाईट कृत्यांमुळे नाराज होता. घडलेल्या प्रकारात, असा आरोप आहे की त्याच्या वडिलांची स्वतःच्या सुनेवर वाईट नजर होती. त्यामुळे घरात अनेकदा तणाव निर्माण होत असे. असाच एक वाद फार टोकाला गेला आणि त्यातून धक्कादायक प्रकार घडला.

कशावरून झाला टोकाचा वाद?

पुष्पेंद्र आणि त्याची पत्नी दोघे मथुरा येथे राहत होते. तर त्याचे वडील आग्रा जिल्ह्यात राहत होते. एका कौटुंबिक सणाला पुष्पेंद्र त्याच्या मूळ वडीलांकडे आला. सून सोबत न आल्याने वडील संतापले आणि त्या दिवशी वादाने हिंसक वळण घेतले. त्या दिवशी घरातच वडील आणि मुलामध्ये वाद सुरू झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वडिलांचा राग इतका वाढला की, त्यांनी जवळच ठेवलेल्या धारदार शस्त्राने आपल्या मुलावर हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की हल्ल्यादरम्यान वडिलांनी मुलाच्या छातीत वार केले, ज्यामुळे पुष्पेंद्र जागीच मरण पावला.

खुनाला आत्महत्या दाखवण्याचा झाला प्रयत्न

गुन्हा केल्यानंतर, पुष्पेंद्रचे वडील म्हणजेच आरोपीने संपूर्ण घटना आत्महत्येसारखी वाटावी यासाठी कट रचला. त्याने पुष्पेंद्र जवळ एक पिस्तूल ठेवली आणि शरीरावर असलेल्या जखमेत एक जिवंत काडतूस पुरले. जेणेकरून असे दिसून येईल की पुष्पेंद्रने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपीने आपली पत्नी आणि मृतदेहाची आई चंद्रवती यांनाही पुष्पेंद्रने आत्महत्याच केल्याचे निवेदन देण्यास भाग पाडले.

कसं उघडकीस आलं सत्य?

मृत्यू पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला, जिथे वैद्यकीय तपासणीत मोठा खुलासा झाला. डॉक्टरांना असे आढळून आले की मृत्यू गोळीमुळे झाला नाही तर धारदार शस्त्राने झालेल्या गंभीर जखमेमुळे झाला आहे. जखम सुमारे दोन सेंटीमीटर खोल होती आणि त्यात जाणीवपूर्वक एक काडतूस भरण्यात आले होते. यानंतर, पोलिसांनी संपूर्ण प्रकरण हत्येच्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली.

आरोपी वडिलांना अटक

पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मोबाईल कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा सर्व गोष्टी वडिलांच्या विरोधात जात होत्या. लोहा मंडीचे एसीपी मयंक तिवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. अखेर आरोपी वडीलांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले, तिथून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

Web Title: father in law had crush on daughter in law heated arguments turned into violence with fatehr killed son in Uttar Pradesh Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.