शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बाहेर तृतीयपंथी म्हणून भीक मागतो; घरी मुलीवरच अत्याचार करतो, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:05 IST

नागपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर: नागपूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विकृत व्यक्तीने स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर या विकृताने आपल्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा बोभाटा झाला. त्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे.

संज्या हा नराधम ४० वर्षांचा आहे. तो कामचुकार तर आहेच त्याला विविध विकृतीही जडली आहे. तो तृतीयपंथियांचा वेष करून घरून बाहेर पडतो आणि रस्त्यावर पैसे मागतो. ‘दुसरेही सावज’ शोधतो. घरच्या महिलांसोबतही त्याचे वर्तन विकृतच असल्याने त्याची आणि त्याच्या भावाची पत्नी अशा दोनही महिला संज्याच्या विकृतीला कंटाळून निघून गेल्या. त्यामुळे संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ, भावाचा ७ वर्षीय मुलगा आणि वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमधील घरात राहतात. संज्याचा भाऊ चौकीदारी तर आई घरगुती काम करते. हे दोघे बाहेर गेल्यानंतर नराधम संज्या स्वत:च्या मुलीवर आणि पुतण्यावर वासना शमवत होता. 

डॉक्टर तरुणीवर बलात्कार; त्यानंतर तिच्याच आई- वडिलांना पाठवला व्हिडिओ, औरंगाबादमधील प्रकार

शुक्रवारी दुपारी ३ वाजता अचानक संज्याची वृद्ध आई घरी परतली. तिने दार ढकलून बघताच विवस्त्रावस्थेतील नराधम चिमुकलीवर अत्याचार करताना दिसला. बाजूला सात वर्षीय चिमुकला होता. वृद्धेने आरोपी संज्याला लाथ घालून दूर केले आणि शिवीगाळ करून दोन्ही नातवांना घराबाहेर आणले.

वृद्धा संतापाच्या भरात शिवीगाळ करताना बघून शेजाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. शेजारच्यांनी वृद्धेला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वृद्धा दोन्ही चिमुकल्या नातवांना घेऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. ठाणेदार सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संतापजनक प्रकार ऐकून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.

द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये वास्तव्यास होते नरेंद्र मोदी; पाहा एक रात्रीचा काय आहे खर्च!

शेजाऱ्यांचा संताप अनावर

चिमुकली आणि चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. हा नराधम या दोघांची अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करायचा. त्यांना मारहाणही करायचा. त्यामुळे हे बिचारे लहानगे गप्प राहायचे. पोलिसांनी त्यांना बोलते केले असता त्यांनी आपल्या बोबड्या भाषेत या नराधमाची विकृती कथन केली. ती ऐकून काही वेळेसाठी शेजाऱ्यांसोबत पोलिसांचाही संताप अनावर झाला.

टॅग्स :nagpurनागपूरsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस