द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये वास्तव्यास होते नरेंद्र मोदी; पाहा एक रात्रीचा काय आहे खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:26 AM2021-09-26T10:26:45+5:302021-09-26T11:17:18+5:30

अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी वॉशिंगटन डीसी येथील हॉटल द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल (The Willard InterContinental) मध्ये वास्तव्यास होते.

अमेरिकेतील तीन दिवसांचा दौरा संपवून नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मायदेशी रवाना झाला आहेत. या दौऱ्यात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. या दौऱ्यात मोदींनी मोठमोठे उद्योजक, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्या आधी मोदींनी क्वाडच्या शिखर परिषदेतही सहभाग घेतला होता.

मोदींचा हा अमेरिका दौरा भारतीय सैन्य दलाला मोठे बळ देणार आहे. अमेरिकेचे खतरनाक हवाई ड्रोन भारत विकत घेणार आहे. याचरोबर हा दौरा आणखी एका गोष्टीसाठी महत्वाचा ठरला आहे. अमेरिकेने भारताला १५७ वस्तू गिफ्ट केल्या आहेत. या वस्तू म्हणजे भारताच्याच आहेत, परंतू तस्करी करण्यात आल्या होत्या. प्राचीन ठेवा असलेल्या १५७ कलाकृती आणि अँटीक वस्तू अमेरिकेने भारताकडे सुपूर्द केल्या आहेत.

अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी वॉशिंगटन डीसी येथील हॉटल द विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल (The Willard InterContinental) मध्ये वास्तव्यास होते. हे हॉटेल अमेरिकामधील सर्वात आलिशान हॉटेलपैकी एक आहे. जवळपास सर्व राष्ट्रपती येथे दुसऱ्या देशांतून येणाऱ्या नेत्यांना मेजवानी करत आहे. त्यासाठी काही मोठे मोठे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. पीएम मोदी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत ते आतून किती अलिशान आहे, इथे एक रात्र राहण्यासाठी काय खर्च आहे.

क्लासिक रूम ": या हॉटेलमध्ये अलिशान हॉटेलमध्ये ३३५ रुम आहेत. या क्लासिक रुममध्ये गेस्टचे भव्य स्वागत होते. या खोल्यांमध्ये नव्ही, आईवरी कलर, ग्रे आणि गोल्ड कलसने सुंदर टच दिला आहे.या रुमसाठी किंमत ३६१ ते ३८६.१२ डॉलर ( २६६१४ रुपयांपासून २८४६६ रुपये) पर्यंत आहे. इथे स्वीट्स रूमची किंमत ६१६.४२ डॉलर (४५४३९ रुपये) आहे.

सिटी व्ह्यूच्या हिशोबांने या रुमची किंमत आणखी वाढू शकते. या आलिशान हॉटेलमध्ये प्रत्येक रूममध्ये एक किंग बेड किंवा दोन क्वीन बेड, वॉक इन मार्बल शॉवर किंवा बाथटबसोबत शॉवर , पॉवर आउटलेट आणि यूएसबी चार्जिंग पॉईंटसोबत वर्क डेस्कसोबत आणि एक कॉफी मशीन देखील उपलब्ध आहे. या सोयी सुविधांमुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव करुन देतात.

मिटिंग रुम : या हॉटेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजमधील जवळपास १९ मिटिंग रुम आहे, ज्या फेडरल स्टाईलमध्ये डिझाईन केल्या आहेत. प्रत्येक मिटींग रुममध्येसाठी वेगळी स्पेस आहे.

येथील ऐतिहासिक बॉलरूम, क्रिस्टल रुम आणि विलार्ड रुम या प्रायवसीसाठी ओळखले जातात. तसेच दुसऱया मजल्यावर प्रायवेट मिटिंग रुमची खूप चांगली आणि खास व्यवस्था केले गेले

आलिशान रो हाऊस : १८१६ मध्ये पेंसिलवेनिया एव्हेन्यूच्या १४वी स्ट्रीटवर कॅप्टन जॉन टायलोद्वारा बनवले गेलेले रो-हाऊस एक हॉटेलसाठी जोशुआ टेनीसनला लीजवर दिला होता. पण त्यानंतर ३० वर्षांना या हॉटेल आणि संचालकच्या नाव कित्येक वेळा बदलण्यात आले.

१८५३ साली विलार्ड सिटी हॉटेलमध्ये पहिले राष्ट्रपती फ्रँकलिन पियर्स यांचेही येथे स्वागत करण्यात आले. विर्लाड आज आपल्या भव्य आतिथ्य आणि लक्झरीसाठी जगभरात ओळखले जाते.