शिवसेनेच्या उपशहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला; माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:14 IST2022-07-20T15:13:13+5:302022-07-20T15:14:56+5:30
Attack on shivsena worker : गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या उपशहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला; माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप
कल्याणः येथील कल्याण पूर्वेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज दुपारी १२.३० च्या सुमारास चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. हल्ला करताना दांडके आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला असून पालांडे यात जखमी झाले आहेत. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी त्यांच्या माणसांकडून हा हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे. गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पालांडे यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांना हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पूर्वेतील विजयनगर परिसरातील संतोषी माता मंदिरासमोर ही घटना घडली. या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.