नेवाळीत पराभूत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 17:40 IST2021-01-20T17:39:36+5:302021-01-20T17:40:16+5:30
Fatal Attack : जाधव यांच्या हाताला दुखापत झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवाळीत पराभूत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ठळक मुद्देज्ञानेश्वर जाधव असे हल्ला करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
अंबरनाथ - ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उमेदवारांवर राग काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळीत पराभूत उमेदवाराच्या पतीवर हल्ला करण्यात आलाय. ज्ञानेश्वर जाधव असे हल्ला करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. जाधव यांच्या पत्नी नेवाळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर जिंकलेल्या उमेदवाराच्या समर्थकांनी ज्ञानेश्वर जाधव यांच्या घरी येऊन त्यांच्यावर हल्ला केला. यात जाधव यांच्या हाताला दुखापत झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.