ठळक मुद्देया प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही वायरल झाला आहे.माळीविरोधात भा. दं. वि. कलम ३२३ आणि ५०४ अन्वये तक्रार दाखल केली आहे. 

मीरा रोड - मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीवर तिच्या फॅशन डिझायनरला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

प्राजक्ताने शोदरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून आपल्याला मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची तक्रार फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही वायरल झाला आहे. यामध्ये या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवणार असल्याचं जान्हवी म्हणत आहे. तर प्राजक्ता माळीने माझे वडील पोलीस असून माझे काका वकील असल्याने मला फरक पडत नसल्याचं इशारा तिने व्हॉट्स अ‍ॅप मेसेजला दिलेल्या प्रतिउत्तरातून दिसत आहे. पोलिसांनी प्राजक्ता माळीविरोधात भा. दं. वि. कलम ३२३ आणि ५०४ अन्वये तक्रार दाखल केली आहे. 


Web Title: The fashion designer has accused the actress of assault her against Prajakta Mali
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.