सोनखास येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 16:56 IST2019-09-22T16:53:25+5:302019-09-22T16:56:26+5:30

पुढील तपास लाडखेड पोलीस करीत आहे.

Farmer's son committed suicide at Sonakhas | सोनखास येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या

सोनखास येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या

ठळक मुद्देही घटना रविवारी सकाळी १० वाजता सोनखास (हेटी) ता.नेर येथे घडली. रुद्रेश्वर रामकृष्ण देवनारे (४०) असे मृताचे नाव आहे.=

सोनखास (यवतमाळ) - स्वत:च्या शेतातील माळ्याला दोरीने गळफास लावून शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजता सोनखास (हेटी) ता.नेर येथे घडली. रुद्रेश्वर रामकृष्ण देवनारे (४०) असे मृताचे नाव आहे.
परिसरात खासगी लाईनमनचे काम करत असलेला रुद्रेश्वर हा वडिलांच्या नावावर असलेली पाच एकर शेती वाहत होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मागे आई, वडील पत्नी व दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास लाडखेड पोलीस करीत आहे.

Web Title: Farmer's son committed suicide at Sonakhas