म्युझिक टीचरने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला, ब्लॅकमेल करत रेप करत राहिला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:14 IST2022-02-26T19:12:11+5:302022-02-26T19:14:03+5:30
Faridabad Rape Case : अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करून म्युझिक टीचरने तिच्यावर रेप करणं सुरू केलं. इतकंच नाही तर म्युझिक टीचरने महिलेच्या एका मैत्रिणीलाही तिचे व्हिडीओ आणि फोटो पाठवले.

म्युझिक टीचरने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला, ब्लॅकमेल करत रेप करत राहिला आणि मग...
हरयाणाच्या फरीदाबादमध्ये (Faridabad Rape Case) एका म्युझिक टीचरला (Music Teacher) आपल्या विद्यार्थिनीचा रेप केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनुसार, म्युझिक टीचर महिलेच्या घरी जाऊन तिला म्युझिक शिकवत होता. यावेळी घरी महिलेचा पती नसायचा. म्युझिक शिकवताना महिलेसोबत म्युझिक टीचरने जवळीक साधली आणि तिचे अश्लील व्हिडीओ-फोटो काढले. अश्लील व्हिडीओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करून म्युझिक टीचरने तिच्यावर रेप करणं सुरू केलं. इतकंच नाही तर म्युझिक टीचरने महिलेच्या एका मैत्रिणीलाही तिचे व्हिडीओ आणि फोटो पाठवले.
अखेर वैतागलेल्या महिलेने हिंमत एकवटून महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ घडलेला सगळा प्रकार सांगितला. यावेळी महिला घाबरलेली होती. त्यानंतर तिची काउन्सेलिंग करण्यात आली.
पोलिसांसाठी आरोपीला पकडणं एक मोठं आव्हान होतं. कारण तो फरीदाबादमध्ये केवळ अर्ध्या तासांसाठी येत होता. आरोपी म्युझिक टीचरने पीडित महिलेला ती महिला पोलीस स्टेशनमध्ये असतानाही फोन करून त्रास दिला. यादरम्यान पोलिसांनी त्याचं मोबाइल लोकेशन ट्रेस केलं आणि त्याला अटक केली.
आरोपीची चौकशी करत असताना त्याच्या फोनमध्ये इतरही अनेक महिलांचे फोटो आणि मोबाइल नंबर मिळाले. पोलिसांना संशय आहे की, आणखीही काही महिलांसोबत या आरोपीने बलात्कार केला असेल आणि त्यांना ब्लॅकमेल केलं असेल. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.