धक्कादायक! रात्री 3 वाजता पतीने पत्नीला Video Call केला, म्हणाला 'बघ असा घेतात गळफास' अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 12:10 IST2022-03-21T12:07:53+5:302022-03-21T12:10:21+5:30
Crime News : एक आत्महत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्यासमोरच गळफास लावून घेतला.

धक्कादायक! रात्री 3 वाजता पतीने पत्नीला Video Call केला, म्हणाला 'बघ असा घेतात गळफास' अन्...
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. काही लोक आपल्या आयुष्याला इतके वैतागतात की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. फरिदाबादमध्ये एक आत्महत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि तिच्यासमोरच गळफास लावून घेतला, याच दरम्यान "बघ असा घेतात गळफास..." असं त्याने म्हटलं आहे.
घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव राजकुमार होतं. 26 वर्षीय राजकुमार कुशीनगर उत्तर प्रदेशचा राहणारा होता. पोलिसांच्या तपासानुसार, कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमारचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.
राजकुमार हा डबुआ येथील उत्तमनगर येथे भाड्याच्या घरात राहून सुतारकाम करायचा. आत्महत्येपूर्वी त्याने रात्री तीन वाजता पत्नीला व्हिडीओ कॉल केला. यावेळी तो म्हणाला की, मी तुला आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ दाखवतो. हे ऐकून पत्नी घाबरली. तिने कुटुंबातील सदस्यांना उठवलं. व्हिडीओमध्ये राजकुमारने प्रथम गळफास कसा घ्यायचा हे सांगितलं.
राजकुमारने पत्नीसमोर गळफास लावून घेतला. याच दरम्यान पत्नी रडत होती आणि त्याला असं न करण्याची विनंती करीत होती. मात्र राजकुमार याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. पत्नीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या शेजारच्यांना फोन करून याबाबत सांगितलं. मात्र ते पोहोचपर्यंत राजकुमार याने जीव सोडला होता. अद्याप आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.