अरेरे! गर्लफ्रेंडने विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडले, १५ फ्रॅक्चर; ७ वर्षांची लव्हस्टोरी, भयानक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:23 IST2025-04-16T12:22:44+5:302025-04-16T12:23:18+5:30

एका गर्लफ्रेंडने तिच्या विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडल्याची घटना समोर आली आहे. जखमी बॉयफ्रेंडला तब्बल १५ ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे.

faridabad girlfriend broke her already married boyfriend hands and legs suffered 15 fractures in haryana | अरेरे! गर्लफ्रेंडने विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडले, १५ फ्रॅक्चर; ७ वर्षांची लव्हस्टोरी, भयानक शेवट

फोटो - ABP News

हरियाणातील फरीदाबादमध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्या विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडल्याची घटना समोर आली आहे. जखमी बॉयफ्रेंडला तब्बल १५ ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर फरिदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बॉयफ्रेंडचं लग्न झालं असून त्याला तीन मुलं आहेत. गुलशन बजरंगी असं त्याचं नाव असून तो फरिदाबादच्या सारन गावचा रहिवासी आहे.

गुलशनने दिलेल्या माहितीनुसार, सारनच्या जवाहर कॉलनी भागात त्याचं मोबाईलचं दुकान आहे. २०१९ मध्ये गुंजनची आणि त्याची भेट झाली. ओळखीच रुपांतर हे हळूहळू प्रेमात झालं. २०१५ मध्ये त्याचं आरती नावाच्या मुलीशी झाले होतं. त्याला तीन मुलं आहेत. तर गुंजनचा तिच्या पतीसोबत ९ वर्षांपासून वाद आणि घटस्फोटाचा खटला सुरू होता.

लग्न करण्यासाठी सतत दबाव

गुंजनला एक १० वर्षांची मुलगी आहे. दोघेही सात वर्षे एकत्र होते. त्यांची लव्हस्टोरी सुरू होती, पण गुंजन आता त्याच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होती, लग्नाला तो सतत नकार देत होता, कारण त्याला पत्नी आणि तीन मुलं आहेत, पण गुंजन ऐकतच नव्हती. गुलशनने जेव्हा लग्न करण्यास नकार दिला तेव्हा गुंजनने त्याच्याशी जोरदार भांडण केलं. 

२१.५० लाख रुपये मागितले परत

२९ मार्च रोजी गुलशनने गुंजनला दिलेले सर्व २१.५० लाख रुपये परत मागितले. पैसे परत मागितले तेव्हा गुंजनच्या वडिलांनी आणि आईने त्याला बेदम मारहाण केली. गुंजन, तिचे वडील राकेश, आई किरण कमल आणि इतर चार-पाच गुंडांनी त्याच्यावर काठ्या आणि चाकूंनी हल्ला केला. त्यांनी रस्त्यात तसंच अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. 

Web Title: faridabad girlfriend broke her already married boyfriend hands and legs suffered 15 fractures in haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.